माझी ऑस्ट्रेलिया ट्रीप …(भाग ५)
ऑस्ट्रेलियाचे अजुन एक वैशिष्ठ्य म्हणजे तिथे असणारी सोन्याची खाण..
बॅलेरहॅट म्हणुन एक गाव आहे..मेलबर्न पासुन साधारण २०० ते २५० किलोमिटर अंतरावर हे गाव आहे..इथे जुन्या म्हणजे प्राचिन लोकांची वस्ती होती..तशीच आजही ती मेंटेंन्ड केली गेली आहे..म्हणजे इथे अजुन ही बग्गी फ़िरत असतात…जुन्या प्रकारची वेशभुषा परिधान करुन ही मंडळी इकडुन तिकडे फ़िरत असतात..अगदी अमेरिकन मिलेटरी ड्रेस घालुन फ़ायरिंग करणे, परेड करणे, किंवा त्याप्रकारची वेषभुषा करुन गुरे हाकत जाणे, इ. प्रकार इथे दिसुन येतात…संध्याकाळ झाली की ड्युटी संपते या लोकांची आणि मग हे सर्व लोक आपले नेहमीचे कपडे घालुन आपल्याआपल्या गाड्यातुन जाताना दिसतात…हीच का ती व्यक्ती जी आपण मघाशी जुन्या कपड्यात गुरे हाकत होती???म्हणुन आश्चर्य वाटायचे..म्हणजे तो एक त्यांचा ड्युतीचा भाग असायचा हे कळल्यावर विचित्र वाटले..इतके त्यात खरेपणाचा वास होत असे..
.सोन्याच्या खाणी साठी प्रसिद्ध असलेले हे गाव खरच खुप सुबक आणि सुंदर असलेले दिसते…गावात प्रवेश केल्या नंतरच इथले सौंदर्य मोहवुन टाकते..रस्त्याच्या कडेने विविध रंगी गुलाबाचे ताटवे मन मोहुन टाकतात.सुंदर छोट्या कौलारु इमारती लक्ष वेधुन घेतात..
इथे खाणी आता पूर्वी इतक्या उरल्या नसल्या तरी काही जागा मेनटेन्ड केल्या गेल्या आहेत..इथे भरभक्कम तिकिटे काढुन प्रवेश मिळतो…आत जुन्या पद्धतीची वस्ती वाढवली गेली आहे. इथे मातीतुन सोने कसे काढले जाते याचे प्रात्यक्षित दाखवले जाते..जे खरच अचंबित करण्यासारखे आहे. काही सोन्याच्या वस्तुचे प्रदर्शन व विक्री ही इथे केली जाते.
नदी काठी आपल्याला सोने हुडकायला परवांगी असते…इथे त्यामुळे गर्दी दिसुन येते..प्रत्येकाच्या हातात एक पाटी असते. त्यात नदीतील वाळू काढुन प्रत्येकजण रवळून सोने हुडकण्यात मग्न दिसतो..आम्ही हे जवळजवळ ३तास तिथे सोने शोधत बसलो होतो..आम्हाला ही काही सोन्याचे कण सापडले..एक कण मिळाला की हरकुन जायला व्हायचे..मला सापडला म्हणुन ओरडायचे…असे जवळपास सर्वजणच करत असल्याने…तिथे वेगळीच मजा अनुभवायला मिळाली…जमलेले सोन्याचे कण एका छोट्या पाण्याच्या बाटलीत भरुन आपण साठवु शकतो..असे बरेच कण आम्ही एकत्र करुन आणले…अर्थातच तेथिल आठवण म्हणुन जपुन ठेवण्यासाठी.
ऑस्ट्रेलियातील अजुन एक वैशिष्ठ्य बघायला मिळाले ते म्हणजे ९८मजली इमारत..( ती किती मजल्याची आहे यात वाद आहेच…कुणी म्हणतात ९९ मजली तर कुणी ९७…..मी ९८ म्हणते. )
त्या बिल्डींगचे नाव आहे ’युरेका’…..ही इमारत खुप लांबुन ही दिसु शकते…ही मेलबर्न सीटीत आहे…अक्षरश: डोक्यावरची टोपी पडणे म्हणजे काय असते ते इथे अनुभवायला मिळते..आम्ही या इमारतीवर जावुन आलो..
इथे ही तिकिटासाठी भरपुर पैसे मोजावे लागतात..पण हौसेला मोल नाही हेच खरे..
आम्ही मुद्दामच संध्याकाळी वर पोहचलो….संपूर्ण सीटी उघड्या डोळ्यांनी बघितली…वरुन बघण्याची मजा काही औरच..मेलबर्न ग्रांउंड तर एवढे छोटे दिसत होते की बस्स!…
तिथे संपूर्ण गोल फ़िरुन सीटीचे विशाल दर्शन होते…ठीकठीकाणी मोठ मोठ्य दुर्बीणी लावुन ऍंगल लावुन ठेवलेले आहेत..आणि शेजारी तो काय स्पॉट आहे त्याचे नाव लिहीलेले आहे…म्हणजे दुर्बीणीतुन ही आपण स्पष्ट सगळे बघु शकतो..आम्ही खुप एन्जॉय केले तिथे…हळुहळु जस जस अंधार पडायला लागला , तस तसे हळु हळु सीटीचे लाइट लागायला सुरुवात झाली..आणि मग पूर्ण सीटी दिव्यांनी भरुन गेली…हे दृश्य खरच विलोभनीय असेच होते..वरुन मेलबर्न , बाजुचा समुद्र…बघण्यात काही मजा वेगळीच आहे.या मजल्याचे शेवटच्या ५/६ मजल्यावर सोन्याचा पत्रा लावलेला आहे..सुर्याचे प्रतिबींब पडले की लाबुन ही डोळ्याला त्रास होतो..इतकी सुंदर इमारत आहे.
मेलबर्नच्या सौंदर्याचे हे एक प्रतिक आहे म्हणले तरी वावगे नाही होणार..
——————————————————————————————————————-
सौ.पल्लवी

mast! aavadesh!
bhari..khup aawadale..
mast varnan me sadhya new castle madhe ahe -Dr.geeta kulkarni D ombivli 30-07-2012-
thanks to adwait, piya, & geeta.