आलिया भोगासी…….
चातुर्मास लागला की आपल्याला सणांची चाहुल लागते..आषाढी एकादशी पासुन साधारण चातुर्मासास सुरुवात होते असे मानतात..या चार महिन्याच्या काळात पावसाळा ऋतु असल्याने आपल्याला अनेक संकेत पाळावयास हवे..जसे खाणे-पिणे, आहार—विहार इ. यासाठी निसर्गाने ही आपल्या सोयीच्या दृष्टीने या चार महिन्यात विविध सणांचे नियोजन केलेले दिसते..कारण या चार महिन्यात श्रावण , भाद्रपद, महिन्यात खुप सणांची मांदियाळी झालेली दिसते.या वेळी महिला आणि मुली विशेष खुष असतातच त्या बरोबरिने बच्चे मंडळी ही….कारण स्वयंपाक घरात मस्त मस्त वास दरवेळत असतात..बाहेर पाऊस आणि आत पोटावर ताव मारण्यात येत असतो..
पण आज चित्र जरा वेगळे वळण घेत आहे..पाऊसाने ही आपले वेळापत्रक बदललेले दिसते..बळीराजा दरवर्षी आशेने वर बघत रहातो…पिकासाठी पावसाचे पाणी मिळणे आवश्यक आहे…’श्रावण मासी हर्ष मानसी’ ही कविता लहान पणापासून तोंडात विराजमान आहे…त्याचे ही आता अर्थ बदलु लागले आहेत…
झोके, नागाबो , माहेरवाशिणी यांचे ही महत्व कालबाह्य होत आहे असे दिसते..
नागपंचमी उद्यावर आली म्हणुन मी माझ्या लेकीला म्हणाले,” चल! आपण मस्त बांगड्या भरुन येवुयात.” तर चट्कन म्हणाली, “शी! बांगड्या? मला नको. तुच जा एकटी.” मला या उत्तराची अपेक्षा होतीच म्हणा…कारण दरवर्षीचाच हा संवाद असतो आमचा..
आता खर तर, मी तरी कुठे बांगड्या नेहमी नेहमी वापरते…आजकाल “सण आणि बांगड्या(म्हणजे काचेच्या)” यांचे समीकरण बनु लागले आहे…आज आम्ही ही सोन्याच्या एक दोन बागंड्या घालुन असतो..आता काचेच्या बांगड्यांचे दोन दिवसात ओझे वाटायला लागते..मग मुलींचे सोडाच! हातातल्या बांगड्या कालबाह्य होत चालल्यात. कपाळावरच्या टिकल्या रंगीत, मॅचिंग आणि विविध आकाराच्या झाल्यात..परिस्थिती बदलते आहे.
मला या निमित्ताने माझ्या लहान पणीचे दिवस आठवले..श्रावण महिन्याची आम्ही मुली खुप आतुरतेने वाट पहायचो..आई बरोबर रंगीबेरंगी बांगड्या भरायच्या..खळखळ आवाज येण्यासाठी मुद्दाम हात मागे पुढे हालवायचा..आणि बांगड्यांच्या किणकिणाचा मधुर आवाज ऐकला की कोण आनंद व्हायचा. मेंदी काढायची, नवीन कपडे शिवायचे, लांब सडक बटवेण्या घालायच्या …त्याला मॅचिंग रिबीनी लावायच्या ,गोंडे लावायचे…काय थाट असायचा आमचा. आणि आमच्या आया-ताया पण अजिबात कंटाळायच्या नाहीत आम्हाला नटवायला..नटण्या-मुरडण्याचाच हा महिना असायचा..समस्त पुरुष वर्ग ही आमच्याकडे कौतुकभ-या नजरांनी बघायचा..शाळेत दर शुक्रवारी नविन कपडे घालायला मिळायचे…युनिफ़ॉर्मला सुट्टी.. शाळा दुपारी १२ला भरायची या दिवशी. कारण घरोघरी पुरणा-वरणाचा बेत असायचा न! मग मस्त जेवुन , नटुन शाळेला जायचे..तर श्रावण सोमवारी शाळा दुपारी मधल्या सुट्तीतच सुटायची. कारण उपवास सोडायचा असतो…म्हणजे एकुण काय …खाण्याची चैन!..मग सिद्धेश्वराला जायचे.. रामलिंगला जायचे असे बेत असत..पंचमीला सगळीकडे मोठमोठे झोके बांधण्याची जबाबदारी आमच्या समस्त बंधुवर्गावर असे…खुप खेळायचे.घरी थांबणे नसायचेच. दर मंगळवारी गल्लीत कुणाची तरी मंगळागौर सजायचीच..रात्रभर जागुन भरपुर खेळ खेळायचो आम्ही..खेळत खेळत सर्व खेळ शिकत गेलो..सर्वांच्या घरात खावुचे डबे भरुन असायचेच..कुणाकडे कधी ही गेले, की काही तरी खायला द्यायच्याच समस्त काकूवर्ग! शुक्रवारी सगळ्या मैत्रिणी संध्याकाळी कुणाच्या तरी घरी शुक्रवारची कहाणी ऐकायला एखाद्या आजीकडे चिकटुन बसत असु. खुप आवडे प्रत्येक शुक्रवारची कहाणी ऐकायला…आजी प्रेमाने कहाणी सांगत असत.गौरी गणपतीचे ही तसेच…हळदीकुंकू निमित्ताने घरोघरी आम्ही आया बरोबर वर्णी लवत असू….एकमेकींच्या घरी निमंत्रण देण्यासाठी दिवसभर फ़िरत होतो आम्ही…
आज मात्र मागे बघुन बघितले तर जाणवते, आज किती हे प्रकार कमी झालेत..कुणाला बोलवायचे हळदिकुंकूला म्हणुन विचार करावा लागतो..
किती चित्र बदलले आहे..कालानुसार हे सारे घडत असतेच …बदल हा घडायलाच हवा…पण त्या बरोबर माणसां माणसांमधिल अंतर वाढत चालले आहे हे नक्की. आज कुणी कडुन श्रावण येतो , भाद्रपद येतो आणि कधी संपतो ते करियरच्या मागे धावताना तरुण पिढीला कळतच नाही..लहान मुलांना आपल्या अभ्यास , ट्युशन आणि आपले छंद( जे आयांनी रिकामा वेळ म्हणुन त्यांना जबरदस्तीने लावलेले असतात) जोपासताना सणांची मजा घेता येत नाही..एकमेकींकडे पदार्थांच्या टेस्ट पहाण्यासाठी आज ताटे येत नाहीत.
याला काही इलाज नाही..कारण करियर ही आज बदलेल्या परिस्थितीत तितकेच महत्वाचे आहे. आज स्त्रिया ही घराबाहेर आपल्याला सिद्ध करु लागल्या आहेत. आणि प्रॅक्टीकल बनु लागल्या आहेत.जुन्या विचार प्रवाहात त्या जास्त अडकत नाहीत..आणि जास्त विरोध ही करत नाहीत…जे आणि जसे जमेल ते आणि तसे त्या करतच आहेत..आज या तरुण पिढीची जीवनाकडे बघायची दृष्टी ही बदललेली आहे.सर्व फ़ास्ट लागते .आजच्या बहुतेक मुलींना मंगळागौरीचे खेळ नाही येत ..त्या खेळाने कसा व्यायाम होतो ते त्यांना माहितीच नाही….जिम मध्ये जावुन ,पैसे देवुन यंत्राच्या सहाय्याने त्या खेळ करत बसतात…आणि मंगळागौरीचे खेळ आज व्यावसयिक रुप झाले आहे…जिच्याकडे मंगळागौर तिच्या घरी खेळ खेळण्यासाठी त्यांना पैसे देवुन आमंत्रित केले जाते…त्यात न प्रेमाचा ओलावा न खेळण्यासाठी प्रेमाचा आग्रह. सर्व यांत्रिकपणे एका पाठोपाठ एक खेळ करुन आपले मानधन घेवुन या बायका पुढच्या घरी खेळायला जातात…असो!
फ़ॅशनच्या नावाखाली कपड्यांच्या शोल्डरच गायब झाल्यात..तंग कपडे , लहान चड्या घालुन फ़िरणा-या तरुणी आता सर्रास दिसायला लागल्यात…आपले पाय आणि हात जास्तीतजास्त उघडे ठेवण्यात त्यांना कोण आनंद मिळतो…अशाने पुरुष वर्गाची मने न चाळवली तर नवलच.
मग पुरुष वर्गाने संयम दखवावा ही त्यांच्याकडुन आपण अपेक्षा करतो..आज २१व्या शतकाची ही किंमत आपल्याला नक्कीच मोजावी लागणार आहे हे नक्की..आज विभक्त कुंटुंबपद्धती उदयाला आलीच आहे..पायात नोकरीचे स्केट आलेत..धावपळीचे जीवन अंगी पडत चालले आहे आणि आपल्याला हे सारे स्वीकारायला हवे हे नक्की..कारण बदल नसेल तर तोच तो पणा येतो…आणि जीवन कंटाळ्वाणे होते. जे जे होते ते ते भल्यासाठीच ..असे म्हणायचे आणि गप्प बसायचे ….सारे कसे आपल्या मना सारखे होइल बरे!
आलिया भोगासी …असावे सादर…….हेच उत्तम……हो न !
————————————————————————————————————
-सौ. पल्लवी कुलकर्णी..

chan lekh!!!
khupach chhan…kharach mala kay mazya pidhichya konalach mangalagouriche khel mahitch nahit…aajkal muli lagna karun nawryabarober pardeshat jatat aani tithe kasa shrawan jato aani kashi diwali yete aani kasa Christmas yeto hech kalat nahi…pan kadhi kadhi waite hi watate he sananche mahatwa aamchya aani aamchya pudhachya pidhyana kalanarch nahi…..
khup aawadala lekh…