ऑस्ट्रेलिया ट्रीप….. ..(भाग ६)
मेलबर्न इतकीच सुंदर सिटी आहे सिडनी…
मेलबर्न हुन १०००किलो मिटरवर आहे..इथे जाण्यासाठी सर्व सुविधा आहेत..पण आम्ही आमच्या गाडीने ड्राइव्ह करत कॅनबेरा करुन जायचे पक्के केले…आजुबाजुचा परिसर न्याहाळत, निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेत जायचे ठरवले..इथे ड्रायव्हिंगचे नियम सर्वजण व्यवस्थित आणि काटेकोर पाळत असल्याने कसला ही धोका नसतो..आणि ड्राइव्हर सीटवरिल व्यक्तीला ही त्रास न होता तो डायव्हींगचा आनंद लुटु शकतो.
सिडनी ही अतिशय सुंदर अशीच सिटी आहे..आम्हा उभयंतांचा लग्नाचा २७ वा वाढदिवस निमित्ताने आम्हाला आमच्या कन्येनी आणि जावईंनी दिलेली ही अतिशय छान भेट होती ही सिडनी ट्रीप …
इथे हर्बल ब्रीज, ओपेरा हाऊस आणि सिडनी टॉवर ही मुख्य बघण्याची ठीकाणे आहेत..समुद्र सफ़र करत आम्ही ब्रीज खालुन जावुन ओपेरा हाऊसला भेट दिली…खरच खुप मस्त वाटत होत..बोटीने एक सुंदर वळण घेतले आणि लांबुन ब्रीज खाली बरोबर ओपेरा हाऊस दिसले तेंव्हा अनेक पर्यटकांचे कॅमे-याचे फ़ॅशेस चकाकले…आम्ही खुप फ़ोटो काढले तिथे…
हर्बल ब्रीज हा खुप मोठा आणि ऐतिहासिक ब्रीज आहे.
१९३२ साली हा पूर्ण बांधुन झाला.या पूलाला त्याच्या धनुष्या सारख्या आकारामुळे तेथिल स्थानिक लोकांनी त्याचे “कोर्ट हैंगर” असे टोपण नाव ही दिलेले आहे.हा ब्रिज सिडनी सिटी आणि त्याच्या उत्तरेला असलेल्या अन्य उपनगरांना जोडणारा विशेष पूल आहे..त्यामुळे दळणवळणास याचा खुप उपयोग होतो. हा पूर्ण लोखंडी आहे.आणि आकर्षक रुपात बांधल्यामुळे पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र झाला आहे. त्याच्या खालुन समुद्र सफ़र करत आम्ही ओपेरा हाऊसला भेट दिली..बोटीतुन हा ब्रिज आणि त्याच्या मागे ओपेरा हाऊस हे दृष्य खुपच देखणे दिसत होते आणि बाजुला उभा सिडनी टॉवर…हे वर्णनातीत देखणे रुप मी उत्तम शब्दात नाही व्यक्त करु शकत. पण प्रत्यक्ष डोळ्यात मात्र भरुन घेतले…भराभर हवे तितके फ़ोटो ही काढले…मन तृप्त झाले .
समुद्रातुन सफ़र करताना बरोबर ही तिन ही ठीकाणे ज्या पॉंइंट्ला एकत्र आली…त्याच ठीकाणी माझ्या लेकीने आणि जावयाने आम्हा उभयंताना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा प्रदान केल्या.हे विलक्षण सौंदर्य आणि या दोघांच्या प्रेमपूर्वक शुभेच्छा बघुन मी भारावुन गेले..अगदी डोळे पाणावले माझे.
ओपेरा हाऊस….
अतिशय सुंदर असा वास्तुशास्त्रातला हा नमुना आहे म्हणायला हरकत नाही.इथे भव्य रंगमंचावर,विशिष्ठ असे गाण्याचे कार्यक्रम आणि नाटके होत असतात..हे ओपेरा हाऊस १९७३ साली खुले करण्यात आले.याची रचना , रुपरेखा डेन्मार्क के वास्तुकार जॉन उत्जोंन ने तयार केलेली आहे. २००७ ला याला यूनिस्को विश्व क्षेत्रात मान्यता दिलेली आहे. या हाऊसची बाहेरची रचना ही पूर्ण पणे टाइल्स ची आहे..स्वीडन मध्ये बनलेल्या या दहालाख छप्पन हजार सहा इतक्या चमकणा-या टाइल्सने शुशोभित केलेली ही सुंदर इमारत उभी आहे. वास्तुकलेचा हा उत्तम नमुना आहे..पावसाळ्य़ात या टाइल्स एकदम स्वच्छ धुतल्या जातात आणि इमारत परत उठावदार दिसते.
हे एक सिडनीचे प्रेक्षणीय स्थळ बनले आहे. पर्यटकाच्या वारंवार भेटीने हा परिसर सतत बहरुन गेलेला दिसतो. इथुन समोरच हार्बल ब्रीज आणि सिडनी टॉवर दिसत असल्याने निसर्गाच्या सौंद-यात ही भर पडली आहे.
सिडनी टॉवर …..
सिडनी टॉवर म्हनजे ३०९ मीटर उंचीवर घुमटाकार बारीक पण उंच अशी ही इमारत आहे .ही सिडनीतील सर्वात उंच इमारत असून त्याची उंची आयफ़ेल टॉवर इतकी आहे. त्याचा वरचा भाग पूर्ण सोनेरी आहे. सिडनीतुन कुठुन ही बघितली तरी ही इमारत दिसते.त्याच्या वरच्या मजल्या पर्यंत जाता येते..तिथुन सारी सिडनी डोळ्यात साठवता येते. सिडनी टॉवरला जाताना आधी एक 3D फ़िल्म दखवली जाते…जी नितांत सुंदर आहे..संपूर्ण सिडनीच्या वैशिष्य़ांनी भरलेली ही फ़िल्म दाखवुन जणु सिडनी वरील प्रेम व्यक्त करताना दिसतात ही लोक.
या टॉवर वरुन आपल्याला हार्बल ब्रीज, ओपेरा हाऊस ही बघायला मिळतो जो उंची मुळे अत्यंत छोटा भासतो.
सिडनी टॉवरवर गेल्यावर युरेका बिल्डिंगची आठवण झाल्याशिवाय रहात नाही.
लूना पार्क…
लूना पार्क सिडनी हार्बल ब्रिजच्या उत्तरी टोकाला असलेले दिसते. हे १९३५ साली बांधलेले आहे. मिलसन पॉंइंट वर उभा असलेला हा एक लोकप्रिय मनोरंजक पार्क आहे. इथे मोठमोठे मेरी गो राउंड जसे आकर्षक खेळ आहेत. प्रवेश द्वारावर आपल्याला भव्य विशिष्ठ आइकोनिक चेहरे असलेले दिसुन येतात..हर्बल ब्रीज वरुन ओपेरा हाऊस कडे जाताना वाटेतच हे मोठे पार्क आपल्या दृष्टीस पडते.
सिडनी मध्ये या मुख्य गोष्टीं व्यतिरिक्त आणखी ही काही बघण्यासारख्या गोष्टी आहेत..इथे एकाच ठीकाणी मत्स्यालय, वॅक्स म्युझियम, प्राणी संग्रहालय आहे..मत्स्यालय मध्ये शार्कमासे लक्ष वेधुन घेतात..पाण्याखाली काचेच्या पेटीत जावुन आपण मासे बघुन येवु शकतो..हा अनुभव खुप सुखदायक आणि नवीन होता माझ्यासाठी.
वॅक्स म्युझियम मध्ये गांधीजी, ओबामा, ज्युलिया गिलार्ट, राणी एलिजाबेथ, मादाम तुंसा तसेच अनेक क्रिकेटीयर, गायक, वादक नट नट्या यांच्या बरोबर विविध ऍन्गलने आम्ही फ़ोटो काढले..मजा आली हे म्युझियम बघताना..
प्राणी संग्रहालय काही फ़ार भव्य नव्हते…प्रत्यक्षात कांगारु आणि कोआला बघितल्या मुळे इथे बंदिस्त बघण्यात मजा नाही आली.
परतीच्या मार्गावर आम्ही सिडनी येतिल थ्री सिस्टरस हा पिकनिक पॉइंट बघितला..निसर्ग सौंदर्यांनी नटलेला हा परिसर आहे.
तसेच ऑस्ट्रेलियाची राजधानी कॅनबेरा ही बघिलते..खुप सुंदर सिती आहे ही…तेथिल पार्लमेंट हाऊसला आवर्जुन भेट दिली….त्यावेळी कॅनबेराचे टेंपरेचर होते ५डिग्री सेटींग्रेट ….प्रचंड थंडी मी म्हणत होते…
इथे फ़ोटो सेशन केलेच नेहमी प्रमाणे…( तो आमचा जन्मसिद्ध हक्कच आहे जणु म्हणा )
या ट्रीपचे वैशिष्ठ्य म्हणजे इथे आम्ही विविध देशाचे फ़ूडप्रकार खाल्ले..पाकिस्तानी, इटली, ऑस्ट्रेलियन, चिनी, थायलंडचे थायी, भारतीय, आणखी ही बरेच…बाहेर आलो आहोतच तर सगळ्या डीशेसची चव घेतली..जापनिज खाण्याची त-हा काही वेगळीच होती…ती अनुभवानेच कळते..खेळत खेळत आपल्यासमोर खाणे बनवतात…आपण ही त्यात इन्व्हॉल होत जातो…वेगळा अनुभव होता तो..छान वाटले..मी एकटी पक्की व्हेजेटरीयन होते तरी मला कुठे ही काहीही प्रोब्लेम नाही आला हे विशेष….
येथिल सेफ़ वे म्हणजे मोठ मोठी मार्केट असतात…प्रत्येक सबब (उपनगर) मध्ये एक एक सेफ़ वे असतेच..
तसेच प्रत्येक मॉल मध्ये एक तरी सब वे असतेच..सब वे मध्ये आपल्याला व्हेज नॉनव्हेज असे ब्रेडचे सॅन्डविचेस मिळतात..जे खुप टेस्टी आसतात….
असो..
अशाप्रकारे ऑस्ट्रेलियाचे वर्णन माझे पूर्ण करते..
तरी एक जाता जाता सांगते की आपण म्हणतो की बाहेरील देशामध्ये कुंटुंब व्यवस्था आपल्या सारखी नसते..ते मुलांना एवढे महत्व देत नाहीत..पण हे साफ़ चूक आहे…इथे ही कुंटुंब व्यवस्था मला आढळली..एकेका कुंटुंबात ३/४ अपत्ये असतातच.इथे प्रत्येक मुलाच्या जन्मानंतर सरकार त्यांना ६०००डॉलर एवढी रक्कम तसेच त्याच्या शिक्षणाचा खरच, बाळंतपणाचा खर्च आणि इतर सुविधा पुरवितात….
इथे प्रत्येक मॉल मध्ये लहान मुलांसाठी प्लेगेम्स असतात…अगदी घसरगुंडी, झोके ते कॉम्प्युटर गेम्स.पर्यंत..
मुले ही मॉलस एन्जॉय करतात..
अजुन सांगण्यासारखे खुप आहे…पण तुर्तास इथेच थांबते..आता पुढचा एक भाग लवकरच….
हा भाग आमच्या या वरच्या सर्व आनंदावर गालबोट लावणारा आणि अतिशय त्रासदायक ठरला….कुणाच्या ही वाटेला न येवो असा…..
तो म्हणजे आमचा परतिचा प्रवास…..लवकरच..
———————————————————————————————————————————-सौ. पल्लवी..

mast mast aani mastch….