ऑस्ट्रेलिया ट्रीप..(भाग ७ शेवट…)
“कष्ट्मेव जयते”
परतीचा प्रवास हा आमच्या या वरच्या सर्व आनंदावर गालबोट लावणारा आणि अतिशय त्रासदायक ठरला….कुणाच्या ही वाटेला न येवो असा…..
एवढ्या मोठ्या दोन महिन्याच्या सुंदर वास्तव्या नंतर अखेर परतीचा दिवस उगवला..येण्याचा प्रवास अतिशय सुखकारक झाल्याने विमान प्रवास किती सोप्पा असतो असे वाटले होते..पण………………..
हा पण म्हनजे खरच एक”पण” होता हे कळले..येताना जेटस्टार विमान आम्हाला कॉन्टासने दिले. पावणे चार वाजता आमचे फ़्लाईट लॅन्ड होणार होते.आणि बरोबर २तासांनी आमचे सिंगापूरहून दुसरे फ़्लाईट होते..हे फ़्लाईट मुळातच १०.२०ला उड्डाण करणारे ते ११.३०ला जागचे हलले आणि पुढे दुसर-याविमानाचे क्रॉसिंग असल्याने उड्डाणाला ११.४५ झाले..आम्हाला पुढचे विमान गाठायचे असल्याने थोडे टेन्शन आले होते..पण हरकत नाही आता कव्हर करेल वेळ म्हणुन स्वस्थ बसुन राहिलो…एवढा मोठा प्रवास पण समोर टीव्ही स्क्रीन प्रचंड पैसे भरुन चालुन करायची होती म्हणुन तसेच बसुन राहिलो…. ऑस्ट्रेलियात मी वर म्हणाले त्या प्रमाणे खाण्याचे काही ही विमानात नेवु देत नाहीत..पण विमानात असते म्हणुन निर्धास्त होतो आम्ही…पण हे चायनिज आणि पूर्ण पैसे देवुन खायचे विकत घ्यायचे या पद्धतीचे होते…पैसे देवुन हरकत नाही, पण सगळे परत नॉन्व्हेजच..म्हणजे आमची पूरी वाट लागली..पिणे आमच्या आसपास ही नाही….या विमानात फ़्रूट्ज्युस देखिल नव्हते..फ़क्त ड्रिंक्स जे आम्ही कधी घेत नाही.पाण्याची फ़क्त एक छोटी बॉटल दिली….सगळा आनंदच!
अखेर सिंगापूर आले…पण उड्डाणाला उशीर झाल्याने इथे लॅन्डींगला जागा मिळेना..वर हवेत घिरट्या मारत बसलो…आणि अखेर पावणे सहा झाले लॅन्डींगला..नंतर पाच मिनीटाने दरवाजा उघडला .मग आधी सर्व प्रथम बिझनेस क्लासवाले सोडले आणि नंतर इकॉनामिवाले …बाहेर येवुस्तोपर्यंत आमच्या जीवातजीव नव्हता..कारन सात वाजता आमचे पुढचे फ़्लाइट होते आणि सर्वात कहर म्हणजे बोर्डींगपास आम्हाला सिंगापूरला मिळणार होता.दोन तास आधी पास मिळतो..आता आधी पास घेणे आवश्यक होते…
सिंगापूर एअर पोर्ट प्रचंड मोठे…स्काय बस असते एकाठीकाणाहुन दुसरीकडे जायला…पण आम्हा दोघांना कुठे जायचे तेच कळेना…तिथे कुणी मदतनीस दिसेनात..आणि कहर म्हणजे व्हायचे तेच झाले. बोर्डिंगपास देणे बंद केले होते..आता काय करायचे..खुप प्रयत्न केला तुमची कशी चुक आहे ते म्हणुन सांगायचा…पण जेटस्टार वाल्यांनी हात झटकले..सिंगापूर एअरलाइन्सवाल्य़ांनी कानावर हात ठेवले..दोघांची एकमेंकाशी खुन्नस! दोघे ही एकमेकांवर आरोप करु लागले..आमच्या बरोबर अजुन एक प्रेग्नंट स्त्री होती एकटी..तिची जबाबदारी नकळत आमच्यावर आली..माणुस धर्म म्हणुन! आम्हाला तिथे अजुन पर्यंत खायला काहीही मिळाले नव्हते..नुसते इकडुन तिकडे पळत होतो.अखेरीस त्यांनी सांगितले हे विमान तुमचे चुकले आणि पुढे १०दिवस तुम्हाला कुठेलेही विमान नाही इंडीयात जायला..सगली फ़ुल्ल झालीत.आणि रहायला हॉटेल तुमच्या खर्चाने करायचे..पण आमच्या कडे सिंगापूरचा व्हीसा नव्हता…ते देत ही नव्हते…आता काय करायचे?कुणाशी ही संपर्क होत नव्हता कारन फ़ोन डिस्चार्ज झाले होते..तिथे ठीकठीकाणी कॉम्प्युटर होते जे फ़क्त १०/१५मिनीटे चालुन परत बंद व्हायची व्यवस्था होती …मी पटकन मुलीशी मेल साधुन संपर्क केला आणि उद्भवलेली परिस्थिती सांगितली…त्या दोघांनी मग बरीच खटपट करुन एका विमानात नुकतेचे दोन सिट्चे बुकींग कॅन्सल झालेले दोन सीट दिसल्याने बुकींग केले व नेटवर तिकीट पाठवले…जे दुसर-या दिवशीचे होते…
आम्ही आमच्या सामानाची चौकशी केली तर ते मुंबईला गेल्याचे सांगितले…आणि प्रत्यक्षात जेंव्हा परत बोर्डींगपास घ्यायला गेलो तेंव्हा सिंगापूर एअरलाइन्सवाल्यांनी सांगितले की सामान असे जात नाही पुढे..ते इथेच आहे..मग परत धावाधाव करुन सामान मिळवले..यात आम्हाला जॉली नावाच्या सिंगापूरच्या एअरलाइन्सच्या मदतनीसची खुप मदत झाली.. आणि या सर्व घटनेत मला माझ्या दोन मुलांचा आणि जावयाचा खुपच आधार वाटला..आपण ’आई’ असल्याचे त्या क्षणी खुप समाधान झाले..नाहीतर एवढी मदत कुणीच दुस-याने केली नसती कुणाची..कारण हा त्रास मी फ़क्त चाराआणे सांगितला आहे…असो!…विमानात बसल्यावर मी खुप रडले…
अखेरीस..मुंबईला पाय टेकले आणि असे वाटले की गड्या आपला देशच बरा!
———————————————————————————————————————-
सौ.पल्लवी
