नाती…..
” नाती”
घर असावे घरासारखे, नकोत नुसत्या भिंती।
तिथे असावा प्रेम जिव्हाळा, नकोत नुसती नाती ॥
त्या शब्दाना अर्थ असावा, नकोच नुसती वाणी ।
सूर जुळावे परस्परांचे, नकोत नुसती गाणी ॥
त्या अर्थाला अर्थ असावा, नकोत नुसती नाणी ।
अश्रूतूनहि प्रीत झरावी, नकोच नुसते पाणी ॥
या घरट्यातुन पिलू उडावे, दिव्य घेऊनी शक्ती ।
आकांक्षांचे पंख असावे, उंबरठ्यावर भक्ती ॥
श्रीमती विमल लिमये यांची ही कविता. प्रस्तुत प्रकरणाच्या विषयप्रवेशाला अनुरुप आहे.
(१९ – ७ – १९७५ च्या ‘सकाळ’ मधे लिमयेबाईनी तक्रार केली की लोक माझी कविता उधृत करतात पण मला श्रेय देत नाहीत.) मी हा अपराध टाळला आहे.
किती सुंदर व मोजक्या शब्दात नेमके सांगण्याची किमया लिमयेबाईंना सधली आहे..आज त्यांची ही कविता विविध संस्कार पुस्तकातुन प्रसिद्ध आहे.पण कुणालाही लेखिकेची माहिती नव्हती…आज मला ती मिळाली..ती मी शेअर केली…
आज नात्यातील ओलावा संपुष्टात येतो की काय असे वाटु लागले आहे..आज माणसे जोडण्यापेक्षा आपण जास्तीत जास्त संपत्ती, इस्टेट आपल्या नावावर जमा कशी होइल ते बघतो..आपल्या रक्ताच्या नात्याला प्रतिस्पर्धी म्हणुन बघत आपण त्यांना दूर सारतोय..आणि संपूर्ण जीवनात एकटे पडत चाललोय…मोठमोठ्या बंगल्यात त्यामुळे एकटे राहायची आज माणसांवर वेळ येवु लागलीय..विभक्त कुटुंब पद्धती, मी आणि माझा नवरा आणि आमचे एकच पिल्लू या मुळे आपले विश्व मर्यादीत, कंजुष करुन राहायला लोकांना आवडु लागले आहे..मुलांना मित्र नाहीत, फ़ॅमिलीला विरंगुळा नाही, मी आणि आमचे कवच या आणि एवढ्याच जगात राहायला लागल्यामुळे समाजातच एक प्रकारची संकुचित मनोवृत्ती जन्माल येवु लागली आहे..आणि त्यामुळे फ़ेसबुक, आर्कुट,ट्वीटर यासारख्या सोशल मिडीयावर मित्र जोडले जावुन त्यांच्याशी शेअर करुन मन मोकळे केले जाते.आणि दाराशी आलेल्या व्यक्तिला दारातुनच कटवले जाते…नातेवाईकांचे ये्णे म्हणजे संकट वाटु लागते.
हे कुठे तरी थांबायला हवे नाही का?सिरियल मधील सासू-सूनांची भांडणे आता एकत्र न राहिल्यामुळे कोरडेपणाने पाहीली जातात.त्यातही मन रमत नाही….अशावेळेस…घरात कुणीतरी अजुन असावे असे वाटते न? घर भरलेले असावे..माझे -तुझे म्हणायला तरी कुणी तरी हवेच..भरल्या घरात मग विविध पदार्थ याम्ची रेलचेल चालते, हसी मजाकला ऊत येतो….विचारांची देवाण घेवाण होते.सण समारंभाला रंगत येते…लहान मुलांच्या वास्तव्याने घर किलकारी मारु लागते..अंगणातील झाडे हसू लागतात…घराला जाग येते…ओलावा जाणवु लागतो …आणि एकटेपणाची भिती कुठच्या कुठे पळून जाते..
यासाठी घर असावे…अगदी घरासारखेच….नुसत्या भिंती ,मोठमोठ्या अलिशान इमारती काय कामाच्या ?जर त्यात रहायला माणसांना वेळच नसेल किंवा माणसांसाठी त्यात जागा नसेल तर?
माझ्या ओळखीच्या व्यक्तीच्या १० इस्टेटी आहेत..भरपूर पैसा आहे…मोठमोठ्या शहरात इन्व्हेस्ट्मेंट म्हणुन फ़्लॅट्स आहेत….पण अपंग आई-वडिलांना घरात जागा नाही….काय जाळायच्यात का मग अशा इस्टेटी? पण लोकांच्यात अशी लोक प्रति्ष्ठीत म्हणुन मान्यता पावतात…कारण पैसा बोलतो.त्यापेक्षा झोपडीत आई-वडिलांना संभाळत रहाणारे जास्त श्रीमंत आहेत असे मी म्हणते…’जो जास्त माणसे जोडतो, तो जास्त श्रीमंत’ हे माझे मत आहे..कारण पैसा हा येतो, आणि जातो ही…पण जोडलेली माणसे कधी सोडुन जात नाहीत….
असो…खुप विचार मंथन झाले…..
अजुन काही सुचते आहे..पण आवरते घेते….
——————————————————————————————————————-
सौ.पल्लवी उमेश..

mast ahai ani tetkech khare he ahai
स्वत:लाही स्पेस द्यायची इच्छा आणि तयारी संपुष्टात येऊ लागली आहे तिथे नात्यांची काय कथा.
काय गमावलेय हेच कळत नाही हेच खरं.
छान लिहीले आहे.