माझा ब्लॉग, माझे विचार!

“मन” (एक दीर्घ कविता)

“मन” हे कसं असतं
कुणालाच कळत नसतं
“मन” हे आपलचं असत
अस वाटतानाच चुकत असतं
क्षणात ते इथं,तर क्षणात ते कुठं
हे माहित नसतं…………….

मला वाटतं की मी मनावर राज्य करते…
“मन” माझ्या काबुत ठेवु शकते.
पण एवढे म्हणे पर्यंत……..
“मन” कधीच फ़ूर्रss उडून गेलेलं असतं.

मी इथेच घरी बेडरेस्ट घेत असते…
पण हे पात्र मात्र…….
माझे असून सुद्धा
जगाची सैर करत असते.

क्षणात इथ तर क्षणात कुठं……
क्षणात नव-याच्या मागे फ़िरत असते..
नवरा कुणाच्या मागे फ़िरतो ते बघत असते
रिकामी वेडी मी, त्याला ( मनाला) बघतच नाही
म्हणुन संशयाचे भूत डोक्यात बसवत असते.
भूतच ते,-डोक्यात घर करुन बसू लागते.
आणि हळूहळू माझं अन्‍ नव-याचं बिनसू लागतं
बघणारी टाळकी आम्हां हसू लागतात..
असं हे मन तळ्यातच नसतं ,पण मळ्यात मात्र उगवतं…….

मी मी म्हणणा-यांना अजून “मन” कळलेले नाही
संशोधकांनाही हे आव्हान पेलवलेले नाही…

जगात सगळी सुखं हात जोडून उभी आहेत.
अन्‍ मला त्यात डुबकी मारायची संधी ही आहे.
पण “मन” मात्र माझे पाय ओढत असते.
कधी भूतकाळात गटांगळ्या खात असते
तर कधी भविष्याची सैर करत फ़िरत असते.
आणि मला मात्र…..मला मात्र
साधं वर्तमानात ही सुखानं जगू देत नसते…

शेवटी एकदा ठरवलं,
एवढं शिकलो सवरलो आपण
आता “मन” कन्ट्रोल करायचं
अहो! पण नेमकं काय करायचं?
खूप विचारांती पक्क केलं
एक धाडस करायच ठरवून टाकलं
ऐवी तेवी एवढं शिकलोय आपण
पण पी.एच.डी. तेवढी बाकी राहिलीय..

आता पी.एच.डी.च नक्की केलं…
विषय घेतला—“मन”
“मना”साठी काय वाट्टेल ते करायचे..
पण राबायचे नक्की.
सुरु झालं संशोधन ,मनावरची पुस्तके बघणे
लायब्ररी मागून लायब्ररी धुंडाळल्या,
अगदी हॉर्वड युनिव्हर्सिटीत ही जावुन आले.
पण—पण हाती काहीच लागले नाही.

विचार करता करता सुन्न बसून राहिले.
पी.एच.डी. ची स्वप्ने नुसतीच बघत राहिले
मधे बराच काळ लोटला…..
सारे विसरुन ही गेले..

अचानक एक दिवस सकाळी सकाळी
अंथरुणातच स्वस्थ डोळे मिटुन बसुन राहिले
विचार करता करता, विचार मागे सरत गेले
सरत नव्हते ते सारवले…….

असाच किती वेळ गेला ते कळले नाही
क्षणात काय झाले ते समजले नाही
हवेत तरंगतोय असा भास झाला
तरंगता तरंगता ओंकार नाद जाणवू लागला
अवकाशात एकटीच विहार करु लागले.
माझी मीच स्वत:ला हरवुन गेले…

थोड्या वेळाने जाग आली.
क्षणभरात सर्व उमजुन आले..
आणि जोरात “युरेका”, “युरेका” म्हणुन गेले
अरे! हेच तर ते गमक!
याचेच तर नाव मन:शांती! ध्यान धारणा!

हेच तर या “मना” वरचे खरे रिमोट कंट्रोल.
आता हवे तेंव्हा हवे तिकडे वळवायचे
त्याने नाही आता ,आम्ही राज्य करायचे…
योग –ध्यान धारणा करुन जग जिंकायचे..
—-जग जिंकायचे!!!!!!!!!!!!!

—————————————————————————
सौ.पल्लवी उमेश कुलकर्णी
जयसिंगपूर
१६/२/१२

Advertisements

Comments on: "“मन”……कविता" (4)

  1. Swati Bhide said:

    मन ..वाचता वाचता मन तुला भेटून आले…..जग जिंकायचे गमक ही कळले.

  2. खरच मन हा अनाकलनीय विषय आहे. तुम्ही छान लिहीलय त्यावर..धन्यवाद आणि शुभेच्छा.

  3. kitti mast lihilayas aga tu!!!!!khup kahi samajun gele he vachatana……thanks for this n u r the great

    • kiti chan kvita keleli,ahe he vachatana man maze haravle ahe,jevha vchun zali kavita tevha vatale are hi tar mazyach jivnashi nigadi ahe.itaki chan kavita lihilyabaddal thanks

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s

%d bloggers like this: