माझा ब्लॉग, माझे विचार!

“ Treet –पूर्ती ”

“We want pasta……we want pasta s s s aaa…..”……
टेबलावर चमचे आपटुन आपटुन दोघांनी घर नुसतं डोक्यावर घेतलं होतं. पास्ता तयार होई पर्यंत थोडावेळ लागणार हे माहीत असून ही !……. काय वैताग आहे ! आता सर्वांसाठी पोहे बनवले होते…बरोबर ढोकळा ही……पण नाही ! …. आज आमचा मूड नाही. आज पास्ता खायचा म्हणुन हट्ट……आईंना आणि महेशला नाष्टा देउन, आता या राक्षसांसाठी पास्ता करणे चालु होते….
“अरे…हो …हो…आणतेय……बस ’टू मिनिटस’…..”…म्हणत मी ही त्यांच्या दंग्यात सहभागी होत हसत होते…..पण त्या दोन मिनीटाची मात्र चांगली १५ मिनीटे लागली हो आज मला….
“घ्या एकदाचे…आणि गिळा …” म्हणत, हसत हसत त्यांच्या पुढ्यात डीशेस सरकावल्या…
“अग अनु! असं म्हणु नये हो मुलांना…”…..इती आई ..
“अहो ! गंमत हो!”….म्हणत मी आवरायला उठले…..
“आई आज मला उशीर होईल बरं का यायला…..मिटींग आहे….तुम्ही जेवुन घ्या महेश बरोबर….मुलांची बस आली की ती जातील….तेंव्हा दार व्यवस्थित लावुन आराम करा.”……म्हणत मी एव्हांना बाहेर ही पडले होते…आज जरा उशीरच झाला होता निघायला…. साईट्वर आज मोठे साहेब यायचे होते…..काम किती आणि कसे चाललय हे बघायला….. त्यांचा माझ्यावर विश्वास होताच; म्हणुन तर त्यांनी हे एवढे मोठे काम माझ्या सारख्या स्त्री बिल्डर वर सोपावले होते. या क्षेत्रात जरी आम्ही स्त्रिया असलो, तरी ही पुरुष प्रधान संस्कृती आम्हाला किती पुढे जावु देतील किंवा आमच्या कर्तुत्वावर विश्वास ठेवतील, ते एका परमेश्वरालाच ठावुक…पण परमेश्वराने मला थोडा हात दिल्याने ’माई कन्स्ट्रक्शन’ कंपनीवर म्हणजे माझ्यावर फ़ार मोठा विश्वास ठेवुन हे कॉन्ट्रॅक्ट मला दिले….मी ही खुष होते माझ्या कामावर. इथे ८ मजली भव्य इमारत उभी करत होते ते….आणि ते ही संपूर्ण माझ्या भरवश्यावर …… आणि त्यांचा विश्वास मी जिंकला होता………दोन दिवसात ६व्या मजल्याचा स्लॅब पडणार होता…….पवार साहेब आणि त्यांचे इतर सहकारी आज येणार होते.
गाडी लॉक करुन साईट वर आले, तेंव्हा गाडीचा आवाज एकुन रखमा आणि दगडु(कामावरील कामगार जोडी) दोघे ही त्यांच्या त्या छोट्या खोलीतुन बाहेर आले, ..
“या की बाय…च्या घेनार का?….”
“अरे ! नको रे बाबा! ही काय चहाची वेळ आहे होय?” म्हणत हसत पुढे गेले….
“पवार साहेब आले नाही न अजुन?”..
“नाय…..”
मी वर जातेय…आले की सांग मी वर आहे म्हणुन…..”
“व्हय जी…”
पाचवा मजला चढुन वर गेले तेंव्हा गडी माणसं आपापली कामे करत होती….त्यांना सुचना देत स्लॅबची तयारी कुठवर आली ते ही बघत होते…व्यवस्थित खांब लावलेत का…कुठं सूर्य किरण पास होत नाही न वरुन? ते निरखत होते…..मिक्सर ही आलेला होता…..आता साहेबांना हे सर्व सांगुन, त्यांच्या हातुन उद्याचाच मुहुर्त काढायला हरकत नव्हती…..
पवार साहेब जाम खुष झाले कामावर….आणि उद्याचाच मुहुर्त धरायचा; आणि ते ही बरोबर ११वाजता म्हणुन सांगुन निघुन ही गेले…….मी ही खुष माझ्याच मेहनतीवर…..आता उद्या महेश ला ही ११वाजता यायला सांगावे…….दगडु ने पुढे केलेल्या खुर्चीवर बसुन फ़ायली बघत असतानाच कांती कधी जवळ आली कळलंच नाही…माझ्या पर्स मधे काही तरी शोधत होती….पाठीत रपाटा घातल्याचा आवाज आला, म्हणुन वळुन बघितलं तर, रखमा कांतीला धपाटे घालत ओढत न्यायला लागली….
“असं काहुन करतीया…कितीदा सांग्तीया, कि हाथ लावुनी म्ह्नुन कोन्च्या बी वस्तुस्नी…..पर नाय…..एकुच नाय कुनाच……”
“अगं….हो ….हो…..सोड तिला….” म्हणत मी कांतीला जवळ घेतल…
“अग मारु नये ग लेकराला…..तिला काय समजतंय?…….छान काही तरी दिसलं म्हणुन लावला हात….काय झालं?….आणि मी कधी रागावले का हिला ?……”
“तुमी रागाव्त नाय तायसाब….पन हिला नग कलाया?….”
“अग ! खरंतर माझच चुकलं …रोज मी हिच्या साठी खावु आणते न !…..आज द्यायला विसरले कामाच्या नादात….म्हणुन तिने शोधाशोध केली असेल…..असू दे…लहान जीव तो….”
पर्स मधुन बिस्कीट पुडा काढुन तिला दिला, तर तिने फ़ेकुन दिला….
माझ्या डोळयासमोर सकाळचा प्रसंग जसाच्यातसा क्षणात येवुन गेला….
पोरांनी आज पोह्याची बशी आणि ढोकळा असाच दूर सारला होता…..आपण ही रागावलोच होतो…….नुसती थेरं !….जे पुढ्यात आलं ते खावं न !…..म्हणुन……
“बगा …बगा….नुस्ती मस्ती कर्तीया…बगा…” म्हणत तिने तिच्या एक कानफ़ाडात ठेवुन दिले……आणि कांताने मोठ्ठ भोकाड पसरलं…….
“काय बी देउ नकासा यापुढं…..”…म्हणत ओढत तिला नेवु लागली..
“अग …थांब रखमा….काय झालं पोरीला ते तरी विचारु दे….” म्हणत मी तिला जवळ घेतलं…मांडीवर बसवलं…..तसं..,
“अवं ताईसाब s s s s ” म्हणत रखमा कावरी बावरी झाली……
तिला हे नवीन होतं…आता पर्यंत ताई साब तिच्या लेकराला खावु, खेळणी, कपडे इ. देताना बघितले होते, पण चक्क मांडीवर घेतलेले तिला नवीन होते…….मला कळलं, तिला काय म्हणायच होतं ते…..मी नजरेनच गप्प बसवले तिला….
“हं बोला आता कांताबाई ! रडुन झालं की सांगा हं ! का रागावलात आमच्यावर?…आज खावु नाही आवडला का?”
तर मानेने मोठा झोका घेत नाही म्हणाली…..मी हसले….
“बरं मग? आता काय देवु बरं कातांला?….म्हणुन विचार करायचे नाटक करत होते….
तर ती मान फ़िरवुन बोट दाखवुन लांबचा तो गाडा दाखवत होती….मला नीट से दिसेना…..आणि तिला नीटसे सांगता येइना…….म्हणुन रखमा कडे मी काय म्हणते म्हणुन विचारल….तर ती म्हणाली …….
“रातच्यानं एक रसाचा गाडा आलाय तित…..त्यो हीस्नी ह्वा म्ह्न !…कालच्यान द्न्गा निस्ता ….”
“अरेच्या ! एवढ्च होय….कांताला म्हणलं, चला जावु आपण” ……म्हणत आम्हीच तिथं गेलो…आणि कांताला पोटभर रस पाजला….तसा रसवाल्याला सर्व गडीमाणसांना ही द्यायला सांगितला……आणि कांताला रोज द्यायचा बरं….म्हणुन रतिबच लावला…..
रखमाच्या डोळ्यातील अश्रु आणि कांताच्या चेहर्यावरील तृप्ततेचा आनंद मला किती सुखवुन गेला ह्याचे मोल नाही…..
पास्ता साठी हट्ट करणारी मुले आणि रसा साठी आसुसलेली ही पोरं……..दोन्हीं ही कडे ट्रीट हवी होती……पण काय फ़रक आहे या लहान मुलांच्या हट्टात? किती छोटीशी गोष्ट? या Treet-पूर्तीला असा कितीसा वेळ लागतो? पण आपण किती बाऊ करतो नाही का? असा विचार करत गाडीतुन कांताला एक चक्कर ही मारुन आणली…….मग काय आम्ही आणखी खुष आणि खुष……..
“टाटा SSSSSSSSSSS”………
म्हणुन आवाज आला म्हणुन आरशात बघितले , तर रखमाच्या कडेवर बसुन कांता आपला चिमुकला हात हलवत होती……काच खाली करुन मी ही हात बाहेर काढुन तिला प्रतिसाद दिला……तर माय रडत होती आणि चिमणी चिवचिवत हसत होती…….
आणि मी एक वळण घेतले.
………………………………………………………………………………………………………………… .पल्लवी उमेश
जयसिंगपूर

( # कुबेर कथा स्पर्धा– )

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: