Posted in Uncategorized

“आस”….कविता

“आस”…..

प्रेमप्रीत ही बहरुन आली
सार्थक जाहले ते प्रेमाचे,
तुझे न माझे सूर जुळले
पोटी आले ब्रह्मांड सारे।

चाहूल तुझी लागे मज बाई
तन मनात लहर फुलून येई,
गुंजित वारा मोर पिसारा
हलके हलके पसरत जाई।

सूर ताल,नाद ब्रह्म संगीत
मोद तरंग, सुरेल एकसंग,
अलगद वारा करी अलगुज
अस्तित्वाची खूण देई मज।

प्रेमवेडी मी तुझीच माऊली
जन्मोजन्मीची माझी सावली,
गर्भात असे वास तु नऊमास
वेगे वेगे ये मज लागली आस।

अतृप्त मी, अनादी मी
अनंत मी,अविनाशी मी,
तुझ्या जन्मास आतुर मी
आसुसले तव स्पर्शास मी।

आईपणाची भूक ही न्यारी
सार्थक हे स्त्रीजन्माचे भारी,
बाळविना आईस जन्म नोहे
जगती मानवा हे सत्यची आहे।
——————————————

पल्लवी उमेश
‘चिन्मय’ शाहूनगर.जयसिंगपूर.

Author:

मी पल्लवी ...मला लिहिण्याची खुप आवड..पण मी स्वत:च्या आनंदासाठी लिहिते..कुणी छान म्हणावे , कुणाला आवडावे म्हणुन लिहिण्या पेक्षा मला किती आवडते, आवडले याचा विचार मी प्रथम करते.मी कथा, कविता..लेख इ. च्या माध्यमातुन आपल्या समोर येत आहे.मला सतत आनंदी राहायला आवडते...

Leave a comment