Posted in Uncategorized

लेख….मानिनी

” मानिनी ” नोकरी करणाऱ्या स्त्रीस कुटुंबाचे सहकार्य… ‘यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः’ या  मनुस्मृति च्या वचना मध्ये असे सांगितले आहे की,ज्या ठिकाणी स्त्री ची पूजा म्हणजेच मानसन्मान होतो,तिथेच देवता वास करतात. आज 21 वे शतक चालू आहे.मागील अनेक वर्षांपासून स्त्री च्या मध्ये आमूलाग्र बदल होत जाताना दिसतोय.पूर्वीची अबला स्त्री आज सर्वार्थाने सबला बनलेली दिसते..यातच तिची खऱ्या अर्थाने जीत झालेली दिसते…मग या मागे कोण कोण होते,इतिहास काय सांगतो….हा सर्व विषय वेगळा आहे..आपण आज या सबला स्त्री विषयी जरा आत्मचिंतन करू या. आज जन्माला आलेल्या बालिकेचे खूप जोरदार स्वागत होते..पूर्वी सारखे हिडीस फिडीस स्वागत न होता ,समारंभ साजरा होतोय.कारण तिची योग्यता आता समाजाला पर्यायाने पालकांना ही समजली आहे…काही ठिकाणी अजून ही याला अपवाद असलेला दिसून येतोय,पण त्या भागाकडे तूर्तास न बघणे योग्य होईल.तो स्वतंत्र चर्चेचा विषय आहे.असो। आज स्त्री पुरुष हे दोघे ही समान अधिकाराचे मानकरी झालेत. हे दिवस स्त्री ला अनेक संकटांना तोंड देत बघायला मिळालेत.पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून ताठमानाने ती उभी आहे..प्रत्येक क्षेत्रात आज तिचा वावर आहे.यशस्वी ही होत स्वाभिमानाने ती मार्गक्रमण करत आहे. सफाई कामगार पासून रिक्षा..ट्रक चालवणे,विमान,अंतरिक्षात,बॉर्डरवर, राजकारण,समाजकारण,डॉक्टर, वकील,इंजिनिअरिंग ,अशा प्रत्येक क्षेत्रात आज ती उच्च पदावर कार्यरत आहे.या अशा स्त्री ची ही गगनभरारी ही निश्चित कौतुकास्पद आहे..ती हे सर्व करत असताना मात्र हे लक्षात घ्यायला हवे की, पुरुषांच्या मानाने ती एक पाऊल पुढे आहे…कष्ट आणि जबाबदारीच्या दृष्टीने. स्त्री ही निसर्गतः प्रजननासाठी निर्मिलेली गेली आहे..शिवाय घर ,कुटुंब यात भावनिक दृष्टीने जास्त अडकणारी आहे..घरची जबाबदारी पर्यायाने कुटुंबातील सर्व सदस्य, मुलांचे संगोपन ह्या उत्तम रीतीने सांभाळत,तारेवरची कसरत करत या बाहेरच्या जबाबदार्या पार पाडत आहे. हे सर्व करत असताना कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य व्यवस्थित असणे अर्थातच आवश्यक आहे. घरची घडी व्यवस्थित असेल,तरच बाहेरची आघाडी यशस्वी पणे पार पाडता येते.घरात कुरबुर असेल ,तर पुरुष तो मनाचा कोपरा बंद करून बाहेर व्यवस्थित परिस्थिती हाताळू शकतो,पण स्त्री चे तसे नसते.घरात गडबड तर मनात गडबड-गोंधळ. मुलं आजारी असतील तर निम्मा जीव घरात अडकतो. अशावेळी घरातील इतर कुटुंबीयांनी जर घरातील जबाबदारी हसत हसत स्वीकारली,तर ही स्त्री बाहेर विनाटेन्शन काम करू शकेल.. पूर्वी सारखे आता एकत्र कुटूंब पद्धत अस्तित्वात नसली,तरी काही वेळा आपल्याला इतरांची म्हणजे नातलगांची आवश्यकता असतेच.मन फ्रेश होणे,मोकळे होणे ही त्यामुळे घडत असते..एकमेकांना हवे नको पाहण्याने घरात सकारात्मक लहरी निर्माण होतात,ज्या मन स्वस्थ करण्यास सहाय्यभूत होतात..अशाने स्त्री मनावर कोणतेही दडपण न घेता बाहेर आपले काम विनाप्रयास करू शकते.. नोकरी करणाऱ्या स्त्रीस जर कुटुंबाचे सहकार्य असेल ,तर एक यशस्वी स्त्री आपल्याला घरोघरी दिसेल…यात प्रामुख्याने नवरा,भाऊ,वडील,मुलगा,मित्र,सहकारी….. ह्यांचे ही योगदान तितकेच महत्वाचे आहे. कारण हे सर्व कौटुंबिक सदस्यच आहेत..कुणी ही आपल्या आई,बहीण,बायको,सखी हिला कमी न लेखता तिला प्रोत्साहित केले ,तर विनाप्रयास ही ती अर्धी लढाई जिंकते,हे नक्की.. आता मी सासू-सून या विषयावर जास्त भाष्य करणार नाही…कारण पूर्वीच्या सासू आणि आजच्या सासवा यात जमीन आसमांचा फरक पडलाय…आजच्या सासवा या शिकलेल्या,कमावत्या,आणि बाहेरच्या क्षेत्रात अनुभवी असल्याने,काय मनस्थिती असते नोकरी करणाऱ्या बाईची,ते ती उत्तम प्रकारे जाणते. त्यामुळे आधुनिक स्त्री ने न कळत का होईना पण अर्धी लढाई जिंकली आहे. स्त्रीला कामासाठी बाहेर पडताना कौटुंबिक जबाबदाऱ्या पेलत त्याचा तोल संभाळत काम करावे लागते. अशावेळी ती जैविकदृष्ट्या व मानसिकदृष्ट्या ही पुरुषांपेक्षा जास्त चिवट असलेली दिसते.अनेकदा तणावग्रस्त परिस्थितीत पुरुषांपेक्षा ती जास्त चिकाटीने तग धरते. त्यामुळे अत्यंत गुंतागुंतीचे मासिकचक्र, गरोदरपण, प्रसूती, पालकत्व, त्यानंतर कुटुंबाची जबाबदारी पेलण्याची नैसर्गिक ताकद तिच्यात असतेच असते. स्त्रीच्या शारीरिक आरोग्यासह मनाची घडणही गुंतागुंतीची आहे. या सगळ्या रेट्यात तिच्यातील मानसिक समस्या वाढत्या आहेत, का तर आधुनिकतेची आव्हानेच आज एवढी बोजड झालीत की,ती पेलता पेलता आणि या संस्कृतीरक्षकांची मर्जी संभाळता संभाळता तिची शारीरिक- मानसिक दमछाक होते. मात्र या तिच्या मानसिक समस्या ओळखण्याची संवेदनशीलता तिच्या कुटुंबाकडे असेलच, असे सांगता येत नाही…पण संयमाने आणि मोठ्यामनाने तिला आपलंसं करून मी किंवा आम्ही … आहे किंवा आहोत तुझ्या मागे हा विश्वास तिच्या मनात निर्माण करता आला,तर ती बाहेरच्या जगातील सर्व समस्यांना किंवा येणाऱ्या चॅलेंजला हसत हसत तोंड देऊ शकते. घरातील मुलांची,सासुसासरे,नणंद,दिर… आले गेले पाहुणे….यात पूर्वीची स्त्री अडकून पडायची..पण आज ती कर्तृत्ववान बनली आहे…तिचे क्षेत्र विस्तारते आहे, शिवाय आर्थिकदृष्ट्या सुद्धा दोघांना घराबाहेर पडणे गरजेचे असल्याने आता तरी ती या घरगुती समस्यांतून बाहेर पडायलाच हवी… त्यासाठी कुटुंबातील सदस्यांनी तिला मानसिक सपोर्ट अवश्य द्यायला हवा,तिला मान ही द्यायला हवा…तू करतेस ते योग्यच आहे ही जाणीव तिच्या मनापर्यंत पोहचायला हवी …वेळ प्रसंगी तिच्या मुलांचे संगोपन, खाणे पिणेची जबाबदारी ही घेता यायला हवी…आजकाल डे-केअर सर्वत्र असतात,पण तिथे किंवा शाळेत सोडणे, आणि आणणे ही कामे सुद्धा करून आपण तिला मदत करू शकतो.. सर्वात महत्वाची भूमिका नवऱ्याला पार पाडायची असते…त्याच्या पूर्ण सपोर्ट ने ती मोकळ्या मनाने बाहेरची कामे करू शकते… आता हे सर्व मी साधारण विवाहित स्त्री बद्दल लिहिले…पण जी कुणी घरातील मुलगी,आई,वहिनी….या रुपात बाहेरची कामे, नोकरी,व्यवसाय अगदी दुसऱ्या घरची धुणी भांडी,मजुरी स्त्री या….यांच्या ही बाबत माझी हीच भूमिका आहे…. अशा प्रकारे नोकरी करणाऱ्या स्त्रीस कुटुंबाचे सहकार्य असेल तर ती “मानिनी” म्हणून स्वाभिमानाने आपली यशस्वी मार्गक्रमण करत राहील हे नक्की.. आता या नोकरी करणाऱ्या स्त्रीचे आपल्या कुटुंबातील सदस्यांशी कसे वर्तन हवे….हा एक स्वतंत्र वेगळा विषय आहे…तो परत कधी तरी…. तूर्तास इतकंच…. ………………………………………

©पल्लवी उमेश 9823735570 “चिन्मय”,सुदर्शन कॉर्नर, शाहूनगर,जयसिंगपूर. जिल्हा.कोल्हापूर Show quoted text

Author:

मी पल्लवी ...मला लिहिण्याची खुप आवड..पण मी स्वत:च्या आनंदासाठी लिहिते..कुणी छान म्हणावे , कुणाला आवडावे म्हणुन लिहिण्या पेक्षा मला किती आवडते, आवडले याचा विचार मी प्रथम करते.मी कथा, कविता..लेख इ. च्या माध्यमातुन आपल्या समोर येत आहे.मला सतत आनंदी राहायला आवडते...

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s