नवीन वर्ष….
सरत्या वर्षाला निरोप देताना
खूप काही गवसले बहुदा
आठवणींच्या गाठोडीत
हरवून बसले स्वतःला
काय घडले,किती बिघडले
नोंद ठेवता ठेवता मीच विसरले
कित्येक गेले आणि गमावले
सोडून सारे पुढे सरकले
आले सुगंधी क्षण ही कोवळे
हलके फुलके मोरपीस फिरले
क्षणांचे ही सोने केले
आनंदात न्हावुन गेले
आली सवारी संकटाची
जगभरात पुरुनी उरली
कंबरडे मोडले जनमानसाचे
घरात कोंडुनी श्वास स्वतःचे
वर्ष सरले भितीने पछाडले
कित्येक स्व नाते गमावले
मास्कचे दागिने स्वीकारले
अन जगायला परत आसुसले
नवीन वर्ष दारात उभे
चाहूल सुखाची दिसे
विसरून सारे सामोरे जाऊ
नववर्षाचे स्वागत करू
नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दीक शुभेच्छा!
©पल्लवी उमेश
31 डिसेंबर,2020