Posted in लेख

श्रीगणेश जीवन परिचय…

🐀🐀🐀🐀🐀🐀🐀
श्री गणेश जीवन परिचय
१] वडील = भगवान शंकर
२] आई = देवी पार्वती
३] मोठा भाऊ = कार्तिकेय
४] बहीण = अशोकसुंदरी
५] 2 पत्नी = रिद्धी व सिद्धी
६] 2 पुत्र = शुभ व लाभ
७] श्री गणेशाचे जन्मठिकाण = दोडीताल,उत्तरकाशी/कैलास पर्वत
८] श्री गणेशाचा जन्म कशापासून झाला ? = देवी पार्वतीच्या अंगावरील मळ आणि उटण्यापासून
९] वाहन उंदीर/मूषकाचे नाव = डिंक
१०] शिव मानस पूजेत श्री गणेशाचे नाव = प्रणव
११] गणेशाची पूजा/भक्ती करणाऱ्या संप्रदायाचे नाव = गाणपत्य
१२] श्री गणेशाला प्रथमपूज्य का म्हणतात? = कोणत्याही कार्यारंभी अग्रपूजेचा मान असल्याने
१३] बालगणेशाचा शिरच्छेद कोणी केला ? = भगवान शंकर
*१४] चूक लक्षात येताच त्यांनी श्री गणेशाला कसे पुनरुज्जीवित केले ? = *हत्तीचे शिर बसवून*
*१५] श्री गणेशाने महर्षी व्यास व्यासरचित महाभारत महाकाव्याचा निर्मितीत कोणती भूमिका पार पाडली ? = *लेखनिक*
१६] श्री गणेशाला प्रिय असणारे खाद्यपदार्थ = मोदक,लाडू
१७] आवडता रंग व फुल = लाल,जास्वंदीचे
१८] प्रिय पत्री = दूर्वा,शमीपत्र
१९] हातातील मुख्य अस्त्रे = पाश,अंकुश
२०] नारद पुराणानुसार श्री गणेशाची मुख्य १२ नावे = सुमुख,एकदंत,कपिल,गजकर्णक,लंबोदर,विकट,विघ्ननाश,विनायक,धुम्रकेतू,गणाध्यक्ष,भालचंद्र व गजानन
२१] श्री गणेशाची सुखकर्ता दुःखहर्ता ही लोकप्रिय आरती कोणी लिहिली ? = समर्थ रामदास स्वामी
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
आपण सगळे दर वर्षी गणपती बसवतो पण का बसवतो याचे कारण कोणालाही माहीत नाही..
आपल्या धर्म ग्रंथानुसार भगवान वेद व्यास ऋषि यांनी महाभारत हे महाकाव्य रचले, परंतु त्यांना त्याचे लिखाण करणे शक्य होत नव्हते म्हणून त्यांनी श्री गणेशाची आराधना केली आणि गणपती ला महाभारत लिहिण्याची विनंती केली. त्या वेळी गणपती ने होकार दिला. हे लिखाण दिवस रात्र चालले आणि त्या मुळे गणपतीला थकवा आला, आणि शरीरातील पाणि ही वर्ज्य झाले अशा वेळी गणपतीच्या शरीराचे तापमान वाढू नये म्हणून व्यास यांनी श्री गणपती ला मृत्तिकेचे म्हणजे मातीचे लेपन केले आणि भाद्रपद शुक्ल चतुर्थीला गणपती ची यथा सांग पूजा केली. माती चे लेपन केले म्हणून गणपती आखडून गेला म्हणून याला पार्थिव गणेश असे नाव पडले. हे लिखाण दहा दिवस चालले. अनंत चतुर्दशीला हे लिखाण संपल्यावर व्यास यांनी गणपती कड़े पाहिले असता त्याच्या शरीराचे तापमान खुप वाढले होते. हे तापमान कमी व्हावे आणि गणपती च्या अंगावरची माती निघावी म्हणून व्यासांनी गणपती ला पाण्यात विसर्जित केले. या दहा दिवसात व्यासांनी गणपती ला खाण्यास वेगवेगळे पदार्थ दिले. तेव्हा पासून गणपती बसवण्याची प्रथा पडली.
ती प्रथा आज ही कलियुगात अव्याहत आणि अखंडीत पणे चालू आहे.

श्री गणेशाची कृपा आपल्यावर सदैव राहो हीच त्या गणेशचरणी प्रार्थना आणि आपणा सर्व भक्तास हार्दिक शुभेच्छा🙏

Author:

मी पल्लवी ...मला लिहिण्याची खुप आवड..पण मी स्वत:च्या आनंदासाठी लिहिते..कुणी छान म्हणावे , कुणाला आवडावे म्हणुन लिहिण्या पेक्षा मला किती आवडते, आवडले याचा विचार मी प्रथम करते.मी कथा, कविता..लेख इ. च्या माध्यमातुन आपल्या समोर येत आहे.मला सतत आनंदी राहायला आवडते...

Leave a Reply

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s