रंगपंचमी…
रंगांची उधळण घेऊन आली
हसत नाचत रंगीत रंगपंचमी
नऊ रंगाची नऊ रुपे लेवूनी
नवी नव्हेली नवरी ही नटली
आनंदाचे उधाण पसरे सभोवार
लहान थोर भिनले सारे एकसार
कुणी न गरीब कुणी न अमीर
जातपात अंतरी हा पडला विसर
प्रेमरंगात न्हाऊनी भिजली राधा
गोप गोपिका संगे करी जलक्रीडा
कृष्ण गीतात अडकली ती मीरा
विसरली मोह माया जन सकला
सत्य असत्य रंग आहे मोह माया
चढती उतरती मुखवटे ही काया
रंग बदलू दुनिया ही बाजार सारा
जपून टाक पाऊल मायबाप माझा
…………………………………………..
पल्लवी उमेश
12.3.23