Posted in Uncategorized

गीतेश्वरी: श्रीमद्भगवद्गीता अध्याय दुसरा (श्लोक ११ ते १५) | Shrimad Bha…

आज या श्लोका पासून खऱ्या अर्थाने गीतेला सुरुवात होतेय…चुकवू नये असे काही…

Posted in Uncategorized

आला सण संक्रांतीचा…

आला सण संक्रांतीचा……

आला नवीन वर्षाचा
सण पहिला हा आला
भोगी आणि संक्रांतीचा
संगे करू चला साजरा

सर्व भाज्यांचा फळांचा
हंगाम हा चालू झाला
ताज्या भाज्या मटार
गाजर,वांगी आणि शेंगांचा

भोगीची भाजी लेकुरवाळी
तीळ बाजरीची भाकरी न्यारी
मूग खिचडी चे जेवण आगळे
तीळ चटणी अन लोणी वेगळे

तिळगुळाची पोळी मोठाली
त्यावरी तुपाची धार सोडावी
खाऊन तृप्तता ढेकर देई
वामकुक्षी अंमळ जास्त होई

सांजवेळी काळी चंद्रकोर
त्यावरी दागिने मनोहर
हळदीकुंकू सख्यांसवे
लुटालुटींना नवा ऊत येई

तिळगुळाचे आदान प्रदान
गोडबोलाचे शाश्र्वत दान
घेऊ तुझे माझे सुखाचे वाण
तिळगुळ घ्या गोड गोड बोला.
………………………………………..
©पल्लवी उमेश
14/1/24

Posted in Uncategorized

श्री ब्रह्मचैत्यन्य महाराज…..

अनंतकोटी आशीर्वाद
द्या मज स्वामी महाराज
पुण्याई सकल असु द्यावी
जनासी आशिष आज

ब्रह्मांड भोवती फिरे
तुझी आशीर्वाद माया
कृपा मजवरी आहे कारे
अखंड भिजे ही काया

नायक असे या त्रिभुवनी
कार्य राम नाम त्रिलोकी
जप करे जो राम मनोमनी
पार नैया त्यासी यालोकी

राजाधिराज असे आमुचे
नसे संभ्रम मनी कोणतासे
पूज्य भाव आमुचे ठायी
नतमस्तक होई तव पायी

योगिराज दिसे काया
वसतसे मनमंदिरी माया
भक्त वत्स निज वसती
तव कृपा सदैव असती

ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर नाम
गाजतसे आसमंती चराचर
महिमा पसरे भूवरी रामनाम
श्रीराम जय राम जयजय राम

महाराज की जयजय कार
त्रिखंडात त्रयोदक्षरी प्रचार
संगे लेवुनी मुखी रामनाम
श्रीराम जय राम जयजय राम
श्रीराम जय राम जय जय राम ….

………………………………………
©पल्लवी उमेश
जयसिंगपूर