Posted in कविता, स्वरचित..., Uncategorized

अवकाळी…..कविता

अवकाळी……

मार्ग माझा हा एकला,
म्हणती ऋतू पांगले ते।
दिला सोबती तो सोडुनी,
अन्य एकास भिडे जाऊनी।

ऋतूंची ही अदलाबदल,
पाहुनी गडबडले बाराजण।
एकमेकांचे उसनेपण,
घेतले मागवून क्षणभर।

मेघराजाने पसरले हात,
थंडीने पाय घेतले आत।
अवकाळी तो बरसला,
बळीराजाचा घास पहिला।

सृष्टीची दैना ही झाली,
वरपांगी दशा अवतरली।
महागाईचा मेरूपर्वत,
आणीबाणीचा आठव देई।

नको विधात्या आवर आता,
सन्मार्गावर चाल आपुला।
तीन ऋतूंचे बारा भाग,
ऐसें निरंतर राहो वारंवार।

पल्लवी उमेश

6/12/17

Author:

मी पल्लवी ...मला लिहिण्याची खुप आवड..पण मी स्वत:च्या आनंदासाठी लिहिते..कुणी छान म्हणावे , कुणाला आवडावे म्हणुन लिहिण्या पेक्षा मला किती आवडते, आवडले याचा विचार मी प्रथम करते.मी कथा, कविता..लेख इ. च्या माध्यमातुन आपल्या समोर येत आहे.मला सतत आनंदी राहायला आवडते...

Leave a comment